बहर्मीवॉश बनविण्याची पद्धत ,
साधारण 50 किवा 60 लिटरचे प्लॅस्टिकचे ड्रम घेऊन ड्रमच्या बुडाशी दामनाएवढे लहान छिद्र पाडावे ड्रमच्या बुडाला चार इंचाच्या विटांचा तुकड्याचा व जाड वाळूचा थर देऊन त्यावर जाळी ठेवावी . त्यावर कुजलेले शेणखत टाकून ड्रम भरून त्यावर एक किलो गांडूळे सोडावीत . ड्रमच्या तळाशी व्हर्मीवाश गोळा करण्यासाठी हडी ठेवावी . दहा दिवसांनी गांडूळांची पूर्ण वाढ झाल्यावर दररोज सकाळी एक लिटर पाणी घालावे . हे पाणी 24 तास पाझरसन खालच्या हंडीत जमा होते . एका ड्रममधून 800 ते 900 मिली . या प्रमाणात गोळा होतो . त्याचा रंग पिवळा असतो यालाच व्हर्मीवॉश म्हणतात सदर द्रावणात नत्र 1.32 टक्के , स्फुरद 0.72 टक्के व पालाश 065 टन असते शिवाय पिकवाढीस लागणारी इतर सुक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा असतात . असे द्रावण वापरून बुरशीनाशक व पोषक अन्नद्रव्ये करण्यासाठी वापरतात . फवारणी करावयाची असेल तर 200 लिटर पाण्यात 4 लिटर हर्मीवॉश द्रावण मिसळून वापरता येते .
व्हर्मीवॉश वापरण्याचे फायदे
1)पिकावरील बुरशीचा नाश होतो 2 ) नत्र , स्फुरद , पालाश व सुक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरूपात असल्यामुळे पिक जोमदार वाढते .
3 ) किटकनाशकावरील व खताचा खर्च कमी होतो .
4 ) घरगुती बाजारभावापेक्षा 90 टक्क्यांनी स्वस्त पडते . व्हर्मीवॉश सर्वत्र वापरता येते . सर्वसाधारणपणे पिकाच्या वाढीच्या कालावधीत व्हर्मीवॉशच्या दोन का बारण्यामधील अंतर 10 ते 15 दिवसाचे असावे . हंगामी पिकासाठी 3 ते 4 फवारण्या तर वार्षिक पिकासाठी 5 ते 6 फवारण्या कराव्यात वहर्मीवॉशच्या फवारणीमुळे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याने त्याचा वापर वरचेवर केला तरी चालतो .
No comments:
Post a Comment