Wednesday, November 11, 2020

NPK fartiliger नत्र ( N ) स्फुरद ( P )पालाश ( K )

 नत्र ( N ) : नत्राच्या अभावी फळझाडांची वाढ खुरटी होते . बाजूच्या फांद्या , पाने आणि खोड बारीक होतात . झाडांच्या मुळांची वाढ मंदावून विस्तार कमी होतो . पानांचा पिवळसर किंवा फिकट हिरवा होतो . पानांतील हरितद्रव्य कमी होते . जुनी पाने अकाली गळून पडतात . पानांची टोके व कडा जळाल्यासारख्या दिसतात . पानांतील हरितद्रव्य कमी होऊन उत्पादन घटते . फळांची संख्या व आकार कमी होतो . फळे कठीण बनतात . कोबीवर्गीय भाजीपाल्यामध्ये पाने कमी लागतात आणि गड्डा तयार होण्याची क्रिया मंदावते . कंदवर्गीय भाजीपाल्यामध्ये जुन्या पानांवर पिवळे , नारंगी व तांबडे डाग पडतात . आंब्याच्या फळांचा आकार बिघडतो ( मालफॉर्मेशन ) . 

स्फुरद ( P ) : स्फुरदाच्या कमतरतेची लक्षणे थोड्याफार प्रमाणात नत्राच्या कमतरतेसारखी दिसतात . मुळांची वाढ खुंटते . पाने कमी लागतात . पानांचा आकार बारीक

हिरवी झाक व जांभळे ठिपके दिसतात . त्यांची प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते . कमतरता असल्यास पाने पिवळी पडतात . पाने अकाली गळतात . फळझाडामध्ये मोहो . कमी येऊन फळे कमी लागतात . फळांचा पक्वताकाळ लांबतो . संत्र्याच्या फळांची साल जाड होऊन ती आतून पोकळ होते . शुगरबीटच्या पानांमध्ये फॉस्फेटचे युग्मीकरण फॉस्फोरिलेशन ) कमी होते . बटाट्याच्या आतील भागात लालसर गंज दिसतो . आंब्याच्या खालच्या अंगाला लालसर जांभळे चट्टे दिसतात आणि कडा लालसर जांभळ्या होतात .

 पालाश ( K ) : पानाच्या कडा व टोके प्रथम पिवळसर पडून तो भाग करपतो वाळल्यासारखा दिसतो . जुनी पाने सुकून करडी होण्यास प्रारंभ होतो . देठ ठिसूळ बनतात झाडांची वाढ हळूहळू होते व खुरटी असते . खोड कमकुवत होते . पाने गळू लागतात बिया व फळे आकसतात आणि फळांची गुणवत्ता बिघडते . पालाशच्या कमतरतेमुळे बटाट्यात पोकळपणा येतो . टोमॅटोत फळे अकाली गळतात व फळांना निकृष्ट रंग येतो भाजीपाला व फळांची टिकण्याची क्षमता कमी होते . फळांची आम्लता कमी होते गळिताच्या पिकात तेल कमी होते . आंब्यात सुरुवातीच्या वाढीच्या काळात नत्राच्या अभावाची लक्षणे दिसतात . पानांच्या कडा जांभळ्या होऊन नंतर करपल्यासारख्या होतो . देठ वेडेवाकडे होतात . खोडांचा आकार बारीक होतो .

गंधक ( S ) : गंधकाच्या कमतरतेमुळे दिसणारी लक्षणे थोड्याफार प्रमाणात नत्राच्या कमतरतेसारखी दिसतात पाने पिवळट हिरवी दिसतात . पाने व देठ यांचा आकार बारीक होतो . झाडे खुरटी , खोड व फांद्या पातळ व चातीसारख्या बारीक गोलाईच्या दिसतात . मुळांचा आकार बारीक होऊन त्यांची वाढ खुंटते . पानामध्ये नत्र हे अमाईड व नायट्रेट यांच्या रूपाने साठते . पानात नत्र व गंधक यांचे गुणोत्तर वाढते . अगंधक अमिनो आम्लाचे प्रमाण वाढते . प्रकाश - संश्लेषण कमी झाल्याने साखरेचे प्रमाण घटते . कोबीवर्गीय पिकात

कॅल्शियम ( Ca ) : कॅल्शियमच्या कमतरतेमुळे मुळांच्या अग्रस्थ भागांची वाढ चांगली होत नाही . शेंड्याची वाढ होत नाही . कळ्या , फुले व फुलोरा गळतो . पीक अवेळी फुलावर येते . कोवळ्या पानांच्या कडा , देठाकडचा भाग कमकुवत होत जातो . टोमॅटो व कलिंगडामध्ये ब्लॉसम एंडरॉट , गाजरामध्ये कॅव्हिटी स्पॉट , सफरचंदामध्ये बिटरपीट व शरीरक्रिया विकृती , वाटाण्यामध्ये शेंगाकूज , कोबीच्या पानातील हरितद्रव्य कमी होऊन पानांची आकडी वळते . फळामध्ये शेंडामर रोग होतो . बुरशी , जिवाणू व पानांवरील डाग यांचे प्रमाण वाढते . लिंबूवर्गीय व घेवड्याची पाने दुमडतात . 
मॅग्नेशियम ( Mg ) : देठ , पानांच्या कंडा व शिरांमधील भागांचा हिरवा रंग कमी होतो . पाने लहान आकाराची होऊन त्यांची गुंडाळी बनते . कोवळी पाने पातळ व ठिसूळ बनून सुकतात . फांद्या नाजूक होतात व वाकतात . हरितद्रव्यांची कमतरता भासते . प्रकाश संश्लेषणक्रिया मंदावते . कोबी , गाजर , शुगरबीट , टोमॅटो , बटाटा , सफरचंद , लिंबू आणि वाटाणा यांच्या पानांच्या शिरांमधील हरितद्रव्य वेगाने कमी होऊन तो भाग पिवळा पडतो ; मात्र कडा हिरव्या दिसतात . बटाट्यात पिष्टमय पदार्थ कमी तयार होतात . चुनखडीच्या जमिनीत वाढणाऱ्या लिंबूवर्गीय झाडांना मॅग्नेशियमची कमतरता जास्त जाणवते . द्राक्षामध्ये खोडकूज रोग होतो .

No comments:

Post a Comment