बाजरी ( Pennisetum americanum L. )
हवामान : बाजरीचे पीक अवर्षणप्रवण भागात खरीप हंगामात घेतले जाते . ५० सें . मी . पाऊस असला तरी त्या भागात बाजरीचे पीक चांगले येते . तापमान २०-३० अंश से . असेल तर जास्त मानवते . उष्ण हवामान , प्रखर सुर्यप्रकाश व हवेत कमी आर्द्रता असल्यास अधिक फादा होतो
पूर्वमशागतः लोखंडी नांगराने जमिनीची १५ सें . मी . खोल नांगरट करावी . नंतर कुळवाच्या २-३ पाळ्या द्याव्यात शेतातील पूर्वीच्या पिकाची धसकटे , हरळी , कुंदा वगैरे वेचावीत तसेच शेणखत उपलब्ध असल्यास हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत पूर्वमशागतीच्यावेळी जमिनीत मिसळावे .
आंतरमशागत आंतरमशागत वेळेवर केली नाही तर उत्पादनात लक्षणीय घट येते . बाजरी पिकांस पेरणीपासून १५ दिवसांच्या अंतराने एक कोळपणी व एक खुरपणी करावी . अॅट्रेझीन ( ५० टक्के ) हे तणनाशक हेक्टरी १-१.५ किलो क्रियाशील घटक ५०० - ६०० लिटर पाण्यातून उगवणीपूर्वी फवारावे .
No comments:
Post a Comment