तृणवर्गीय पिके
ज्वारी
पूर्व मशागतः खरीप ज्वारीसाठी डिसेंबर महिन्यात खोल नांगरट करावी . चैत्र , वैशाख महिन्यात मोठ्या कुळवाची पाळी यावी . त्यानंतर सपाट कुळव्याच्या २-३ पाळया दयाव्यात , शेवटच्या पाळी पूर्वी उपलब्धतेप्रमाणे हेक्टरी ५ १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे . खरीपाचे काढल्यानंतर लगेच रब्बी ज्वारीसाठी शेत तयार करण्यासाठी घ्यावे . कुळवाची पाळी देऊन शेतातील काडी कचरा वेचून घ्यावा . हेक्टरी पाच ते दहा टन शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकावे . यानंतर लगेचच पेरणी करून जाड पाटा फिरवून जमिन घट्ट करावी . त्यामुळे जमिनीत ओल टिकून राहते .
पेरणी : खरीप हंगामामध्ये नैऋत्य मान्सूनचा चांगला पाऊस झाल्याबरोबर ( जूनचा ३ रा आठवडा ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ) पेरणी करावी . त्यानंतर पेरणी केलेल्या पिकावर खोड माशीचा उपद्रव होवून उत्पादनात घट रब्बी ज्वारीची पेरणी १५ सप्टेबर ते १५ आक्टोबरच्या दरम्यान करावी . हेक्टरी बियाणे व बिजप्रक्रिया : खरीप व रब्बी हंगामासाठी ज्वारीचे अन्नधान्यासाठी लागवड करताना हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे . परंतु ज्वारीचे पीक जेव्हा चारा पीक म्हणून घेण्यात येते त्यावेळी हेक्टरी ४० किलो बियाणे पेरावे . पेरणी पूर्वी बियाण्यास ७ ग्रॅम इमिडक्लोप्रीड किंवा ५ ग्रॅम थायोमेथॉक्झाम प्रति किलो बियाण्यास चोळावे व त्यानंतर प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम अझेटोबॅक्टर जीवाणूसंवर्धन चोळावे . त्यानंतर बियाणे सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावे .
No comments:
Post a Comment