सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे
लोह ( Fe ) : लोहाच्या कमतरतेची लक्षणे मॅग्नेशियमच्या कमतरतेसारखी दिसतात . नवीन पालवीतील हिरवेपणा नाहीसा होतो . शिरा हिरव्या राहतात . हरितलवकाची वाढ खुंटते . कोवळ्या पानांची वाढ थांबते . पाने पांढरी पडून वरच्या बाजूस वळतात . पाने पातळ होऊन वाळतात वनस्पतीमध्ये अल्फा अमिनो लिव्होलिनिक आम्लाचे प्रमाण घटते . प्रथिनांचे प्रमाण कमी होऊन विद्राव्य जैव नत्राचे प्रमाण वाढते . मुळ्यांची लांबी खुंटते , मुळ्यांवरील लहानलहान तंतू केस वाढतात . जस्त ( Zn ) : वनस्पतीची पाने पिवळी पडून कमजोर होतात . पानांच्या शिरांच्या मधल्या भागातील ऊती मरतात . शेंड्याकडील पाने खुजी होतात .
No comments:
Post a Comment