Monday, May 4, 2020

Bee,आग्या मधमाश्या ,सातेरी, घुघुरटी

भारत आणि दक्षिण - पूर्व आशियाई देशांत मधमाश्यांचे जास्तीत जास्त प्रकार आढळतात .  भारतात चार प्रकारच्या मधमाश्या आहेत .

१ ) आग्या मधमाश्या - या मधमाश्या वड - पिंपळासारख्या मोठ मोठ्या झाडांच्या आडव्या फाद्यांवर , उंच कडे कपारीत आपली मेणाची घरे बांधतात . एका झाडावर १० - १५ वसाहतीचा संच नजरेच पडतो . या मधमाश्या भरपूर मध गोळा करतात . 

२ ) सातेरी | सातपुडी - या मधमाश्या झाडांतील बुंध्यातील पोकळीत , दगडांच्या कपारीत , अंधारात मेणाच्या ७ - ८ पोकड्या बांधतात .

 ३ ) फुलोरी / काटेकी नाल आकारच्या झाडांचे आडव्या फाद्यांवर , आग्या मधमाश्या प्रमाणेच एकच परंतु लहान आकाराचे पोवळे बांधतात . 

४ ) घुघुरटी - या मधमाश्या नांगीविरहीत असतात . आकाराने चिलटापेक्षा थोड्या मोठ्या मुठ - दोन मुठ आकाराचे आपले घरटे बांधतात . लाखो वर्षापूर्वी वरील पैकी सातेरी मधमाश्याच्या काही वसाहती भारतातून स्थलांतर करीत - करीत युरोपमध्ये पोहोचल्या . युरोपमधील हवामान आणि पर्यावरण यांचेशी जुळवून घेत तेथे चांगल्या स्थिरावल्या . याच युरोपिय सातेरी मधमाश्या . या युरोपिय सातेरी मधमाश्या , भारतीय सातेरी मधमाश्या पेक्षा आकाराने मोठ्या आणि जास्त मध गोळा करणाऱ्या आहेत . 

No comments:

Post a Comment