साहीवाल - ऑलव्हर ( १ ९ ३८ ) यांच्या मते , साहीवाल गुरांचे अफगाणिस्तानातील गुरांशी बरेच साम्य आढळून येते . तसेच जुन्या काळी राजस्थान विभागातून आलेल्या गीर गुरांमुळे त्या गुरांचा अंश त्यांच्यात स्पष्टपणे दिसून येतो . या गुरांचे मूळ स्थान मध्य व दक्षिण पंजाबमधील रावी नदीच्या खोऱ्यात आहे . हा भाग सध्या पाकिस्तान मधील मॉटगोमेरी जिल्ह्यामध्ये आहे . या भागातील उन्हाळ्यातील जास्तीतजास्त उष्णतानान ४०.५ अंश सें . असते व हिवाळ्यातील कमीतकमी ६.१ अंश सें . असते . ही गुरे जड , समान बांध्याची असून त्यांची त्वचा सैल असते . म्हणून यांना " लोला ” असे म्हणतात . ही गुरे लांबट फुगीर छातीची , काहीशी ठेंगणी व सुस्त दिसतात . ही गुरे साधारणतः मळकट , लाल रंगाची असतात . परंतु काही गुरे फिक्या लाल तपकिरी किंदा काळसर रंगाची असून त्याच्या अंगावर पांढरे चट्टे असतात . वळूचे कपाळ रुद भरदार , तर गायीचे मध्यम आकारमानाचे असते . डोळे सौम्य असतात . कान मध्यम आकारमानाचे असून कानाच्या काठावर काळे कंस आढळतात . वळूची शिंगे आरखड जाड असून गायींची बारीक व सैल असतात . मान आखूड पण पातळ असते . पोळ मोठी व शिस्न कातडी लोंबती असते . वळूचे वशिंड भरदार असून बऱ्याच गुरांत एका बाजूला कललेले असते . पाठ सरळ असून पोट मोठे व घेरदार असते . पोटाखालील कातडे लोंबते असते . कंबरेचा वरील भाग रुंद असतो . शेपटी लांब म्हणजे जवळजवळ जमिनीपर्यंत पोचते . गायींची कास मोठी व लवचीक असते . खरे नरम असतात व लवकर शिजतात . पळूच सरासरी वजन ५०० किलो व गायीचे ४०० किला असते
साहीवाल गायी दुभाजू म्हणून प्रसिद्ध असून काही गायीचे एका वेतातील सरासरी उत्पादन २२०० किलो आढळून आले . काही उत्कृष्ट गायी ४.८० किलो दूध देतात . दोन देतातील सरासरी अंतर ५ महिने असते . उत्तम जोपासना केलेल्या कालवाड़ी २॥ ते ३ वर्षात पहिले देत देतात . साहीवाल मैलजोडी मंदगती असून ही जड ओझे वाहण्यासाठी उपयोगी पडते . ही दुधाळू जात आहे .
No comments:
Post a Comment