Monday, December 7, 2020

लालसिंधी

लालसिंधी - ही गुरे पाकिस्तानमधील कराची व हैद्राबाद ( पाकि ) जिल्हयात आढळतात . या जातीची काही गुरे बलुचिस्तानात आढळतात व तेथील गुरांपासून या गुरांची उत्पत्ती झाली असावी . या गुरांचे साहीवाल गुरांशी बरेच साम्य आढळून येते याशिवाय या गुरांमध्ये गीर गुरांचा अंश आढळून येतो . या भागातील जास्तीतजास्त उष्णतामान ४६.१ अंश सें , ते ४८.८ अंश सें . असते हिवाळ्यातील कमीतकमी १.१ ते ४.४ अंश से . पर्यत असते . लाल सिंधी गुरे आकारमानाने लहान असून बदलत्या हवामानाशी समरस होऊ शकतात . या गुरांचा बांधा घट्ट असून छाती भरदार असते . रंग गडद लाल ते पिवळट लाल यामधील कोणत्याही प्रकारचा असतो . काही गुरांच्या कपाळावर व पोळीवर पांढरे ठिपके आढळतात . डोके प्रमाणशीर असून कपाळ काहीसे फुगीर असते . कान मध्यम आकारमानाचे लोंबते असतात . शिंगे मध्यम आकारमानाची व मुळापाशी जाड असतात . त्वचा चमकदार असते . पोळ व शिस्न कातडी लोंबती असते . वळूचे वशिंड मोठे असून गायीचे मध्यम आकारमानाचे असते . वळूचे सरासरी वजन ५५० किलो , तर गायीचे ३५० किलो असते . बैल शेती व इतर कामासाठी उपयोगी असून गायी दुधाकरिता उत्तम असतात . निवडक गायींचे एका वेतातील सरासरी दूध उत्पादन ३०८० किलो होते . गायीचे पहिल्या वेताचे वेळचे सरासरी वय ४३ महिने असते . ही दुधाळू जात आहे .

No comments:

Post a Comment